मोटर सायकल जाळल्या प्रकरणी मनसेच्या सुहास कांदे वर गुन्हा दाखल

July 18, 2009 10:47 AM0 commentsViews: 21

18 जुलै नाशिकमध्ये मोटर सायकल जाळल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेचा माजी जिल्हाप्रमुख सुहास कांदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आला आहे. तसंच त्याला फरार घोषित करून तडीपारीची नोटीसही बजावली आहे. सुहास कांदे ह्याची मनसेच्या जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली असली, तरी नाशिक मध्ये सर्वत्र होडीर्ंगवर व कार्यक्रमांना तो हजर असायचा. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. आज नांदगाव येथे एका कार्यक्रमासाठी सुहास कांदे उपस्थित राहणार आहे. त्याच्या अटकेसाठी नाशिक पोलीसांची दोन पथक नांदगाव येथे पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणी मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी आरोपी कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहीजे असं म्हटलं आहे.

close