नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

December 11, 2014 4:57 PM0 commentsViews:

sakshi_maharaj_34211 डिसेंबर : नथुराम गोडसे हा ही एक राष्ट्रभक्त होता. गोडसे गांधीजींएवढाच राष्ट्रभक्त होता. त्याने रागाच्या भरात काही कृत्य केले असले तर त्याबद्दल काही सांगता येत नाही. पण नथुराम गोडसे हा राष्ट्रद्रोही नव्हता असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्याय. आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यामुळे काहीवेळात साक्षी महाराज यांनी यु-टर्न घेतला.

नथुराम गोडसेच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराष्ट्रात एका हिंदुत्ववादी संघटनेनं कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावरून आज राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी यावर आक्षेप घेत हा मुद्दा सभागृहात मांडला. त्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज दोनवेळा तहकूब करावं लागलं. त्यातच भाजप खासदार साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणून आणखी एक वाद ओढावून घेतला. नथुराम गोडसे हा ही एक राष्ट्रभक्त होता. गोडसे गांधीजींएवढाच राष्ट्रभक्त होता. त्यावेळेस नथुराम गोडसे याच्याही मनात राग होता त्याने केलेली विधानं ही राष्ट्रभक्तीतून होती. त्याने रागाच्या भरात काही कृत्य केले असले तर त्याबद्दल काही सांगता येत नाही. पण नथुराम गोडसे हा राष्ट्रद्रोही नव्हता असा दावाच साक्षी महाराज यांनी केला. त्यांच्या विधानामुळे एकच वाद पेटला. काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. आपल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यामुळे साक्षी महाराज यांनी काही तासातच घूमजाव केलं. मी तसं काही म्हटलंच नाही अशी सारवासारव त्यांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close