ऍडलेड टेस्ट : विराटच्या शतकी खेळीवर भारत तिसर्‍या दिवशी 5 बाद 369 धावा

December 11, 2014 3:03 PM0 commentsViews:

virat_kohali11 डिसेंबर : ऍडलेडमध्ये सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टेस्टचा आज तिसरा दिवस संपला. तिसर्‍या दिवशी विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने 5 विकेट गमावत 369 रन्स केले आहेत.

ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या दिवशी केलेल्या 517 या आपल्या धावसंख्येवर आपली पहिली इनिंग घोषित केली. भारताने आज तिसर्‍या दिवशी या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी उत्तम खेळ केला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने 12 फोर मारत शानदार सेंच्युरी झळकावली. मात्र विराट 115 रन्सवर आऊट झाला. विराट कोहलीबरोबरच ओपनर मुरली विजय , चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी शानदार हाफ सेंच्युरी झळकावत विराटला मोलाची साथ दिली. दिवसअखेर रोहित शर्मा 33 रन्सवर तर वृद्धीमान साहा 1 रन्सवर खेळतायच. टेस्टचे अजून दोन दिवस बाकी असून भारत पहिल्या इनिंगमध्ये 148 रन्स पिछाडीवर आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close