आचरेकर सरांचा सत्कार : सचिन आणि विनोद एकाच व्यासपीठावर

July 18, 2009 2:37 PM0 commentsViews: 14

18 जुलै भारतीय क्रिकेट फॅन्सना आज उत्सुकता होती, ती सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांना एकाच व्यासपीठावर आणणा-या गुरू रमाकांत आचरेकर यांच्या सत्कार समारंभाची. विनोद कांबळीने एका रिऍलिटी शोमध्ये सचिनवर आरोप केल्याची बातमी बाहेर आल्यानंतर दोघं पहिल्यांदाच एकत्रआले होते. पण या कार्यक्रमात वादाचं कोणतंही सावट दिसलं नाही. सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, समीर दिघे यांच्यासारखे क्रिकेटर घडवणारे कोच रमाकांत आचरेकर यांचा शनिवारी वाढदिवस होता. आणि त्यानिमित्त त्यांच्याच शिष्यांच्या हस्ते आचरेकरांचा सत्कार सोहळा नागपूरच्या ठाकरे फाऊंडेशनने घडवून आणला. यावेळी आचरेकरांना पाच लाख रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. यावेळी आचरेकरांच्या शिष्यांनी सरांच्या नावाने होतकरु क्रिकेटरसाठी एक शिष्यवृत्तीही सुरु केल्याचं सांगण्यात आलं. पहिली शिष्यवृत्ती मुंबई टीमचा अंडर सिक्सटिन कॅप्टन हरमित सिंगला देण्यात आली. फाऊंडेशनच्या वतीने सचिन, विनोद आणि आचरेकर सरांच्या इतर शिष्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

close