राजन वेळूकर कुलगुरूपदासाठी अपात्र : हायकोर्ट

December 11, 2014 9:45 PM0 commentsViews:

 rajan welukar11 डिसेंबर : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना हायकोर्टाने दणका दिलाय. कुलगुरूपदासाठी राजन वेळूकर अपात्र आहे असा निष्कर्ष मुंबई हायकोर्टाने नमूद केलाय. त्यामुळे राजन वेळूकर यांचं कुलगुरूपद अडचणीत आलंय.

मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू ए. डी . सावंत यांनी राजन वेळूकर यांच्या निवडी संबंधीत एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केलीये. कुलगुरूपदासाठी राजन वेळूकर यांनी कोणताही शोध-प्रबंध सादर केलेले नाही. कोणत्याही विषयावर त्यांनी संशोधन केलं नाही. त्यामुळे अशी व्यक्ती कुलगुरूपदावर नियमानुसार बसू शकत नाही. राजन वेळूकर यांनी निवडीच्या वेळी खोटी माहिती दिला. प्राध्यापक नसतानाही वेळूकरांची कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली, असा आक्षेप या याचिकेत घेण्यात आलाय. सावंत यांनी याअगोदरही राज्यपालांकडे याबाबत पत्र लिहून तक्रार केली होती. आज या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने सावंत यांच्या बाजूने निर्णय देत राजन वेळूकर कुलगुरूपदासाठी अपात्र असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे राजन वेळूकर यांचं कुलगुरूपद अडचणीत आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close