योगासनांना अच्छे दिन, ’21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस’

December 11, 2014 11:48 PM0 commentsViews:

yoga_day11 डिसेंबर : गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेल्या योग साधना आता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरी होणार आहे. संयुक्त राष्ट्रानं 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या 177 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या पाठिंब्यासह 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून आता साजरा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा व्हावा अशी मागणी केली होती. एवढंच नाहीतर 21 जून या तारखेला हा दिवस साजरा व्हावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. मोदींच्या या मागणीला 170 देशांनी पाठिंबा दिलाय. विशेष म्हणजे मोदींचं योगासनावरच प्रेम हे सर्वश्रूत आहे. देशभरात मोदींनी योग साधनेचा प्रचार केलाय. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानच्या दौर्‍यावर असतांनाही मोदींनी योग साधनेचं महत्व पटवून दिलं होतं. विशेष म्हणजे जगात योग साधनेला ओळख मिळवून दिली योग गुरू बी.एस. अय्यंगार आणि बाबा रामदेव यांनी. अय्यंगार यांनी जगभरात योग साधनेचा प्रचार केला. तर बाबा रामदेव यांनी कपालभाती आणि अनुलोम-विलोम घराघरात पोहचवलं. योग साधनेचा प्रसार करण्यात बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिपाशा बासू यांचंही यात योगदान आहे. भारतात योग साधनेचा जन्म झाला आणि संपूर्ण जगात याची महती पोहचलीये. जगभरातील नागरीक योग साधनेकडे आकर्षित झाले. एकट्या अमेरिकेत जवळपास 1.5 कोटी लोकं नियमित योग साधना करत असतात. अखेर आज भारताची योग साधना जगाच्या पाठीवर पोहचली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close