अभिनेत्रीने दिग्दर्शकाला लगावली थप्पड

December 12, 2014 8:35 AM0 commentsViews:

casting couch drama

12  डिसेंबर : मुंबईत पुन्हा एकदा कास्टिंग काऊचप्रकरण समोर आलं आहे. अभिनेत्री राखी सावंतची मैत्रीण मनिषा कुमारीने चित्रपटच्या दिग्दर्शकाला चक्क मीडियासमोर जोरदार थप्पड लगावली आहे.
चित्रपटात रोल देण्यासाठी दिग्दर्शक सचिंद्र शर्माने आपल्याला ‘कॉम्प्रोमाईज’ करण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप मनिषाने केला आहे. त्यामुळे आपण दिग्दर्शकाच्या थोबाडीत मारल्याचं मनिषाने स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी या ना त्या करणावरूण सतत चर्चेत असलेल्या राखी सावंतनेही मनिषाला साथ दिली आणि दिग्दर्शकाविरोधात कास्टिंग काऊचचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, मनिषाचा पब्लिसिटी स्टंट असून आपल्यावरचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांनी केला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close