तुरडाळीचे भाव भडकले : 100 रुपये किलो

July 19, 2009 2:08 PM0 commentsViews: 4

19 जुलैतूरडाळीचे भाव कडाडले आहेत.मुंबई आणि नागपूर इथे डाळ 100 रुपये किलोवर पोहोचली आहे. आणि त्यामुळे सामान्य माणूस चांगलाच जेरीस आलाय. अकोला इथे जवळ पास दीडशे दालमील आहेत. कच्चा माल महागल्यानं भाव वाढले असं दालमील मालकांचं म्हणणं आहे. तर तूरीचं पीक 18 रुपये किलोने विकलं असा शेतक•यांचा दावा आहे. तूरडाळीच्या उलाढालीत इथल्या बाजार पेठेचा महत्वाचा सहभाग असतो. अकोल्यात या वर्षीचा हंगाम सुरु झाला तेव्हाच्या बाजार भावात दुपटीचा फरक पडलाय.तूरडाळ प्रतिक्विंटलचा भावजानेवारी : 4,200 रुफेब्रुवारी : 4,800 रुमार्च : 4,600 रुएप्रिल : 5,200 रुमे : 5,500 रुजून : 5,800 रुजूनच्या दहा तारखेपासून तूरडाळीनं खरी तेजी घेतली. महिना अखेरीस 65 रुपये किलो तूर दाळ होती रविवारी ती 80 ते 85 रु किलो आहे.

close