अवकाळी पावसाचा फटका, सवाई महोत्सव रद्द

December 12, 2014 6:41 PM0 commentsViews:

sawai_pune12 डिसेंबर : पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अवकाळी पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. कालपासून सुरू झालेल्या या महोत्सवातील उरलेल्या चार दिवसांतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारीत हा महोत्सव होणार आहे.

रसिक ज्या महोत्सवाची आतूरतेने वाट पाहत असतात असा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला गुरुवारी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे सुरुवात झाली होती. पुढील 4 दिवस हा सोहळा रंगणार होता. मात्र या महोत्सवाला अवकाळी पावसाचा फटका बसला. जोरदार पावसामुळे संपूर्ण सोहळा रद्द करण्यात आला आहे. आता हा महोत्सव जानेवारी किंवा फेब्रुवारीत होणार असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close