हेडफोन लावून गाणे ऐकणे जीवावर बेतलं, रेल्वेखाली येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू

December 12, 2014 8:50 PM1 commentViews:

dhule_boy3412 डिसेंबर : मोबाईलला हेडफोन लावून गाणे ऐकणं एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलंय. प्रातर्विधीसाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा रेल्वेखाली आल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना धुळ्यात घडलीये. जात्या वळवी असं विद्यार्थाचं नाव आहे.

धुळे शहरापासून जवळच असलेल्या गरताड इथं माजी मंत्र्यांच्या जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेची आदिवासी आश्रम शाळा आहे. या आदिवासी मुलांच्या आश्रम शाळेतील जात्या वळ्वी या दहावीतला शाळकरी विद्यार्थ्याचा शनिवारी रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला आहे. वळवी हा रेल्वेमार्गावर प्रातर्विधीसाठी गेला असताना हेडफोनच्या साहय्याने गाणे ऐकत असताना अचानक रेल्वे आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची पोलीस ठाण्यात प्राथमिक नोंद करण्यात आलीये. पण शौचालय सुस्थितीत नसल्याचं किंवा शौचालयांचा विद्यार्थ्यांकडून वापर होत नसल्याची बाब समोर येऊ नये म्हणून शाळेच्या व्यवस्थापकांनी संबंधित विद्यार्थी सकाळी रेल्वेरुळावर जॉगिंगसाठी गेला होता. त्याच वेळेस गाणी ऐकत असताना त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल सादर करण्यात आलाय.त्यामुळे विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी साशंकता व्यक्त केली जातेय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • adonis

    railway kashi achanak yeil.. ti ticha track sodun kuthe jate ka?

close