परळीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन

December 12, 2014 9:12 PM0 commentsViews:

munde_smarak12 डिसेंबर : बीड म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि गोपीनाथ मुंडे म्हणजे बीड असं समिकरणचं बनलं होतं. त्यामुळेच त्यांच्या स्मृती कायम आठवणीत राहाव्यात यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मभूमीत ‘गोपीनाथ गड’उभारण्यात येणार आहे. आज परळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पहिली जयंती बीडमध्ये साजरी झाली. परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात गोपीनाथ गडाचं भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या या लाडक्या नेत्यांला आदरांजली वाहण्यासाठी लाखो बीडकरांनी गर्दी केली होती. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या तिन्ही कन्या पंकजा मुंडे, प्रितम मुंडे आणि यशश्री मुंडे बीडकरांचा अभिवादन स्विकारत होत्या. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे पालवे यांच्या हस्ते गोपीनाथ गडाचं भूमीपूजन झालं. यावेळी गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण मंडळाची स्थापना करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीये. याचा 7 लाख असंघटित ऊसतोड कामगारांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close