ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका गंगूबाई हनगल यांचं निधन

July 21, 2009 7:18 AM0 commentsViews: 10

21 जुलै ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका गंगूबाई हनगल यांचं प्रदीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी हुबळी इथे निधन झालं. गेले काही दिवस त्या हुबळीतल्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होत्या.97 वर्षांच्या गंगूबाईंचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात आलंय. 5 मार्च 1931 रोजी जन्मलेल्या गंगुबाई हनगल या किराणा घराण्याच्या गायिका. सवाई गंधर्वांकडे त्यांनी शिक्षण घेतलं. कर्नाटकातल्या हुबळी इथे संपुर्ण आयुष्य घालवलेल्या गंगुबाई हनगल यांनी कृष्णचार्य आणि दत्तोपंत देसाई यांच्याकडेही शिक्षण घेतलं. पंडीत भीमसेन जोशी यांच्या त्या गुरू भगिनी. अनेक वर्ष गंगुबाई हनगल यांच्या शास्त्रीय संगीत मैफलींचा आस्वाद रसिक घेत होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, कर्नाटक संगीत नृत्य ऍकॅडमी ऍवॉर्ड, संगीत नाटक ऍकॅडमी ऍवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.