प्रकाश महाजन यांची मनसेतून हकालपट्टी

July 21, 2009 7:33 AM0 commentsViews: 3

21 जुलै प्रकाश महाजन यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. बीड शहरात शनिवारी मनसेच्या मेळाव्यात मारामारी झाली होती. त्यानंतर महाजन नाराज होते. ब्लॅकमेलिंग करणा•यांना मनसेत पदं मिळतात, असा गंभीर आरोप प्रकाश महाजन यांनी केला होता. पक्षात न्याय मिळाला नाही तर मी घरी बसेन, असंही ते म्हणाले होते. महाजनांनी आपल्याच पक्षावर हल्ला चढवल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. प्रकाश महाजन मंगळवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेेणार असल्याची शक्यता आहे.

close