मंत्र्यांच्या बंगल्यांवर जेवणावळी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

December 13, 2014 1:41 PM0 commentsViews:

fadanvis_cm_sot3313 डिसेंबर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणार्‍या जेवणावळी, संगिताचे कार्यक्रम, गजल संध्या बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात 19 हजारांहून जास्त गावात दुष्काळ असल्यानं संवेदनशीलपणे वागण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना दिलाय.

नागपूरमध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या काळात मंत्री, सचिव, अधिवेशन काळात आलेले प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक, व्यावसायिक आणि पत्रकारांना खास मेजवान्यांसाठी निमंत्रण दिलं जातं. पण राज्यात 19 हजारांहून गावात दुष्काळ असतांना अशा जेवणावळी हा टीकेचा विषय होऊ शकतो म्हणून खबरदारी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा गोष्टी टाळण्यात याव्यात असे आदेश दिले आहे. राज्यात दुष्काळ असताना जेवणाचा कार्यक्रम आयोजित करणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्री तसंच आमदारांनीही तो करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी बजावले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close