अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तारखा बदलल्या

July 21, 2009 8:27 AM0 commentsViews: 3

21 जुलै, मुंबईपहिल्या कट ऑफ लिस्टनंतर प्रवेश घेण्यासाठी दिलेली मुदत एका दिवसाने वाढवण्यात आली आहे. अशी माहिती मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक व्ही. के. वानखेडे यांनी दिली आहे. याआधी ऑनलाईन प्रवेशाची वेबसाईट हँग झाल्यामुळे प्रवेश अर्ज भरायची मुदतही शिक्षण विभागाने एका दिवसाने वाढवून दिली होती. आता दुसरी आणि तिसरी कट ऑफ लिस्ट प्रसिद्ध होण्याच्या तारखा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ऑनलाईन प्रवेशाच्या नव्या तारखा : ऑनलाईन प्रवेशाची दुसरी कट ऑफ लिस्ट आता 24 ऐवजी 25 जुलैला जाहीर होईल. तर तिसरी कट ऑफ लिस्ट 31 जुलै ऐवजी एक ऑगस्टला लागेल. पहिल्या कट ऑफ लिस्टमधील विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत 20 जुलै दिली होती. त्यामध्ये वाढ करुन आता 21 जुलै संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घेता येतील.

close