वीज कर्मचा-यांचा संप मागे

July 21, 2009 3:31 PM0 commentsViews: 1

21 जुलैसोमवारी मध्यरात्रीपासुन सर्व वीजकेंद्रांवर पुकारण्यात आलेलं काम बंद आंदोलन मंगळवारी मागे घेण्यात आलं आहे. राज्य सरकार आणि वीज कर्मचारी यांच्यातली बोलणी पूर्ण झाली आहेत. सरकारशी बोलणी केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. राज्य सरकारने बेसिक पगाराच्या 30 टक्के पगार देण्याचं कबुल केलं. संप मागे घेतल्यानंतर कर्मचारी ताबडतोब कामावर रुजू झाले आहेत. सरकारने इतर मागण्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन कर्मचा-यांना दिलं आहे.

close