बागायतदारांचा उद्रेक, रस्त्यावर फेकली द्राक्षं

December 13, 2014 7:51 PM0 commentsViews:

nsk_drakash13 डिसेंबर : गारपिटीच्या तडाख्याने नाशिकमधील बागायतदारांना मोठा फटका बसलाय. तीन दिवस उलटून गेल्यानंतरही बागांमध्ये येऊन आणि शेतात येऊन पंचनामे केले नसल्यामुळे बागायतदारांनी द्राक्ष रस्त्यावर फेकून निषेध केला. तसंच नाशिक-मुंबई आग्रा महामार्ग काहीकाळ रोखून धरला.

दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकरी आणि द्राक्ष बागायतदारांना पुन्हा एकदा गारपिटीनं झोडपलंय. त्यामुळे आता शेतकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक झालाय. गारपिटी होरपळलेल्या शेतकर्‍यांनी नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर चक्का जाम केला. पूर्ण कर्जमाफी द्यावी ही शेतकर्‍यांची मागणी आहे. तिसरा दिवस उलटला असला तरी बागांमध्ये येऊन आणि शेतात येऊन पंचनामे झाले नस्लयाच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. दरम्यान, पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. त्यांनी आज गारपीटग्रस्त तालुक्यांची पाहाणी केली. तसंच सहकार राज्यमंत्री शिवसेनेचे दादा भुसे यांनीसुद्धा नुकसानीची पाहणी केली आणि आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना ते सामोरं गेले. शेतकर्‍यांच्या भावना आम्ही समजू शकतो त्यापरीने मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री दादा भुसे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close