जयपूरमध्ये गॅस टँकरचा स्फोट, 10 जणांचा होरपळून मृत्यू

December 14, 2014 2:57 PM0 commentsViews:

jaipur accident

14 डिसेंबर :  जयपूरजवळच्या हायवेवर गॅसच्या टँकरने पेट घेतल्याने झालेल्या स्फोटात दहा जण ठार झाले असून बारा जण जखमी झाले आहेत.

शनिवारी रात्री बिलपूरपासून 35 किलोमीटर अंतरावर महामार्गावर एका गॅसच्या टँकरने पेट घेतला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. यावेळी या हायवेवरून काही वाहने जात होती. त्या वाहनांनीही पेट घेतला. या अपघातात 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर हायवेवरील वाहतूकीत मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र आज (रविवार) सकाळी वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

मृतांमध्ये दक्षुल (वय 6), राधामोहन (वय 40), विनोद (वय 37) यांचा समावेश असून अन्य मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती जयपूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नितीन दीप यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close