पाकिस्तानी खेळाडूंच्या अभद्र व्यवहाराचा भारताकडून तीव्र निषेध

December 14, 2014 4:13 PM0 commentsViews:

Hockey

 14 डिसेंबर : चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनल सामन्यात भारताविरूध्द पाकिस्तानने विजय मिळविताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताविरूध्द असंस्कृत शेरेबाजी आणि हावभाव करीत जल्लोष केला. जल्लोष करण्याच्या नादात अनेक खेळाडूंनी मैदानावरच आपले कपडे काढले.

याविरोधात आक्षेप नोंदवित भारताने पाकिस्तानविरूध्द तक्रार नोंदविली आहे. पाकिस्तानी खेळाडूंच्या असंस्कृत वर्तनाबद्दल त्यांच्या हॉकी संघाचे कोच शाहनाज शेख यांनी भारताची माफी मागितली आहे. पण ही माफी भारताने फेटाळली आहे.

पाकिस्तानी संघाने भारतावर 4-3 असा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली. मॅच जिंकल्यावर त्यांनी आपल्या जर्सीजही काढल्या तसंच प्रेक्षकांकडे पाहून असंस्कृत शेरेबाजी आणि हावभाव करत जल्लोष केला.

या प्रकारानंतर संतप्त भारताने इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनची मॅच आयोजित करायला नकार दिला होता पण पाकिस्तानी कोचने माफी मागितल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कारवाई करत नाही तोवर पाकिस्तानबरोबर कुठलीही मॅच खेळणार नाही, अशी कठोर भूमिका भारताने घेतली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close