मला फाशी द्या- कसाबची कोर्टाकडे मागणी

July 22, 2009 10:14 AM0 commentsViews: 2

22 जुलैमुंबई हल्ल्याच्या गुन्ह्याची कबुली देणा-या कसाबने आपल्याला फाशी द्यावी, अशी कोर्टात मागणी केली आहे. गुन्हा कबूल करण्यासाठी आपल्यावर कोणतंही दडपण नसल्याचं कसाबनं स्पष्ट केलं आहे. मी लोकांवर अन्याय केला आहे, त्यामुळे लोकांनीच मला शिक्षा द्यावी असंही कसाबनं म्हटलंय. सोमवारी कसाबने आपला गुन्हा कबूल केला होता. त्यानंतर दोन दिवस तो आपल्या कृत्याची माहिती कोर्टात देत होता. मात्र याबाबतीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या म्हणण्यानुसार 'कसाब हा आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी अश्या प्रकारची खेळी करत असावा. त्यामुळे आम्ही त्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत.' कसाबने गुन्ह्याची केवळ रुपरेषा दिली आहे, त्यामुळे खटला पुढे चालूच राहील' असंही निकम यांनी म्हटलंय.'जर कोर्टाने कसाबची कबूली मान्य केली तर, हा खटला संपवून त्याला लवकरात लवकर शिक्षा होईल. मात्र कोर्टाने हा कबूली जबाब मान्य केला नाही तर हा खटला पुढे चालूच राहील', असं कसाबचे वकील अब्बास काझमी यांनी म्हटलं आहे. कसाबने फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे, याबाबत विचारलं असता काझमी म्हणाले की त्याने स्वत:हून मागणी केली केल्याने आम्ही काहीच करु शकत नाही.

close