बॉलिवूडचे ‘शो मॅन’ राज कपूरना गुगलचा सलाम

December 14, 2014 5:22 PM0 commentsViews:

raj kapoor

14 डिसेंबर :  बॉलिवूडचे ‘शो मॅन’ राज कपूर यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त ‘गुगल’ने डुडलच्या माध्यमातून त्यांना आज (रविवार) आदरांजली वाहिली आहे. ‘श्री 420′ या तुफान गाजलेल्या चित्रपटाच्या पोस्टरवरचे राज कपूर यांचा फोटो वापरून गुगलनं त्यांच्या चाहत्यांना आगळी – वेगळी भेट दिली आहे. बॉलिवूडच्या पडद्यावर सतत नवनवे प्रयोग करणारे निर्माता-दिग्दर्शक आणि हसवता हसवता प्रेक्षकाच्या डोळ्यात टचकन पाणी आणणारा अभिनेता, ही राज कपूर यांची ओळख.

त्यांनी अनेक वर्षं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं होतं. ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘चोरी चोरी’, ‘श्री 420′ या चित्रपटांमधून अभिनय तर ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमांचं दिग्दर्शनही तितक्याच ताकदीने केलं होतं. ‘जिना यहां मरना यहां…’ असं म्हणत सिनेसृष्टीवर जिवापाड प्रेम करणार्‍या या ‘शो मॅन’ने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. त्याशिवाय, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, फिल्म फेअर यासारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close