26 जुलैनंतर प्रकल्प अजूनही अपूर्णच : आयबीएन लोकमतची शोधमोहीम

July 22, 2009 2:12 PM0 commentsViews: 47

22 जुलैशिल्पा गाड, मुंबईमुंबईमधल्या 26 जुलैच्या महाप्रलयानंतर सरकारी यंत्रणांना अजुनही जाग आलेली नाही. अनेक प्रकल्प आजही अपूर्ण आहेत. 26 जुलै 2005 ला आलेला महापूर कोणीही मुंबईकर विसरू शकत नाही. या महापुराला येत्या 26 तारखेला चार वर्ष पूर्ण होत आहेत . या पावसाने शेकडोंचे बळी घेतले. अशा प्रकारच्या आपत्ती नियंत्रणासाठी अनेक प्रकल्पही आले. पण या प्रकल्पाचे पैसे आतापर्यंत पूर्ण मिळालेले नाहीत आणि मिळालेल्या पैशातून पूर्ण कामही झालं नाही. 26 जुलैच्या महाप्रलयानंतर सरकारी यंत्रणांनी काय धडा घेतला, यावर आयबीएन लोकमतची खास शोधमोहीम सुरु आहे.6 जुलै 2004 ते 4जुलै 2009 या काळात शांतीनगरमध्ये पाणी साठण्याचं चक्र अजुनही सुरुच आहे. मुंबईत आजही अनेक भागात ही स्थिती कायम आहे. आजही 26 जुलैच्या आठवणी सर्वंना नकोश्या वाटतात कारण त्या पावसाने अनेकांचं आयुष्य धुऊन टाकलं. मुंबईत काही वर्षापूर्वीपर्यंत हमखास पाणी साठण्याच्या काही ठराविक जागा होत्या. लालवाग, परेल, कुर्ला, वडाळा, अंधेरी, चकाला इथेच पाणी साठायचं. पण गेल्या काही वर्षात पाणी साठण्याच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. भांडुप, मुलूंड, देवनार, विक्रोळी, गोरेगाव इथं पाणी साठण्याचं प्रमाण सातत्याने वाढतंय.मुंबईत पाणी साठू नये म्हणून ब्रिमस्टोवॅड प्रकल्पा अंतर्गत 1200 कोटी मंजूर झाले होते. त्यातले आतापर्यंत 1000 कोटी रुपये मिळाले.आणि खर्च झाले 464 कोटी. पण आजही ब-याच ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा करण्यावर भर दिला जातो. यावर कायम स्वरुपी उपाययोजना नाही, तोपर्यंत या वरवरच्या उपायांचा काही फायदा नाही.

close