राज्यातल्या वैद्यकीय अधिका-यांचा संप मागे

July 23, 2009 3:02 PM0 commentsViews: 2

23 जुलैसरकार आणि वैद्यकीय अधिका-यांमधली चर्चा यशस्वी झाल्याने वैद्यकीय अधिका-यांचा संप मिटला आहे. डॉक्टरांची पगारवाढीची मागणी तसंच इतर मागण्या मान्य केल्याचं लेखी पत्र आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिलं आहे. पण या मागण्या 29 जुलैला मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर या मागण्यांना अधिकृत मंजुरी मिळेल. पगारवाढीचा फायदा राज्यातल्या आठ हजार सरकारी डॉक्टरांना मिळेल. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 100 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. दरम्यान, मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा संपावर जाण्याचा इशारा वैद्यकीय अधिका-यांनी दिला आहे.

close