ऐश्वर्या सर्वात यशस्वी ‘मिस वर्ल्ड’

December 15, 2014 12:37 PM0 commentsViews:

15 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेच्या 22 वर्षाच्या रोलेन स्ट्रॉस या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड 2014 चा किताब पटकावला. भारतासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे लंडनमध्ये पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चन हिला ‘आतापर्यंतची सर्वात यशस्वी मिस वर्ल्ड’ असा किताब मिळाला आहे.

रविवारी झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या दक्षिण आफ्रिकेच्या रोलेन स्ट्रॉस हिने बाजी मारली. जगभरातील 121 सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. भारताच्या कोयल राणा हिलाही ‘टॉप टेन’मध्ये स्थान मिळाले. पण या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरली ती ऐश्‍वर्या राय बच्चन.  कारण या वेळेस तिचा ‘सर्वात यशस्वी मिस वर्ल्ड’ म्हणूण सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी तिच्यासोबत अभिषेक बच्चन, त्यांची मुलगी आराध्या बच्चन आणि ऐश्वर्याची आई वृंदा या देखील उपस्थित होत्या.या वेळेस या विश्वसुंदरीने आराध्या म्हणजेच तिची मुलगी तिचं विश्व असल्याचंही नमूद केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close