गांगुली नाईट रायडर्सचा कॅप्टन

July 25, 2009 11:57 AM0 commentsViews: 1

25 जुलैआयपीएलच्या येणा-या हंगामासाठी सौरभ गांगुलीची कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅप्टनपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या टी-20 क्रिकेट वर्ल्डकप दरम्यान शाहरूख खान आणि गांगुली यांच्यात याबाबत बातचीत झाली होती. याचवेळी शाहरुख खाननं गांगुलीला कॅप्टनसी साठी तयार केल्याचं सुत्रांना सांगीतलंय. ऑगस्टमध्ये याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. आयपीएलच्या गेल्या हंगामात गांगुली कडून कॅप्टनसी काढून ती ब्रँडन मॅक्युलमकडे सोपवण्यात आली होती. गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सला पॉईंट टेबलमध्ये तळाला राहवं लागलं होतं. त्यानंतर कोच जॉन बुकानन यांचीही हाकलपट्टी करण्यात आली होती. बुकानन यांच्या जागी आता कोच म्हणून डेव्ह व्हॅटमोर किंवा जॉन राईट यांची नेमणूक करण्याबाबत चाचपणी सुरू आहे.

close