पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सांवतचा शिवसेनेत प्रवेश

July 25, 2009 2:08 PM0 commentsViews:

25 जूलैइंडियन आयडॉलफेम गायक अभिजीत सांवतने शिवसेनेच्या पक्षात प्रवेश केलाय. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अभिजीत सावंतने म्हटलंय की शिवसेनेत प्रवेश मिळणं हा माझा सन्मानच आहे. मी या पक्षात सामिल झालो याचा मला खूप गर्व वाटतोय असंही त्याने म्हटलंय. मी एक कॉमन मॅन असून पक्षात निवडणूक लढवण्यासाठी आलो नाही. तसंच तरूणांसाठी काम करून, जी जबाबदारी दिली जाईल ती निभावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्याने सांगितलं. अभिजीत सांवतच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या निर्णयावर पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्याचं मनपूर्वक स्वागत के.लं तसंच अभिजीत वर योग्य जबाबदारी देवू असंही म्हटलं.

close