मध्य रेल्वे पुन्हा रखडली

December 16, 2014 10:28 AM0 commentsViews:

333mumbai_local_

16 डिसेंबर : मध्य रेल्वेचे रडगाणे संपता संपत नसून आज (मंगळवारी) पुन्हा एकदा मध्य रेल्वे रखडली. दिवा-डोंबिवली स्टेशनदरम्यान कल्याणच्या दिशेने निघालेल्या लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.

दिवा-डोंबिवली स्टेशनदरम्यान कल्याणच्या दिशेने निघालेल्या लोकलचा पेंटाग्राफ अचानक तुटला. यामुळे सीएसटीहून कल्याण आणि त्यापुढे जाणारी डाऊन मार्गावरील फास्ट ट्रॅकवरील सेवा पूर्णत: विस्कळीत झाली. पेंटाग्राफमधील बिघाड दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालीये. मात्र तोपर्यंत प्रवाशांची चांगलीच कसरत होत आहे. या दरम्यान फक्त डाऊन मार्गावरील सेवा सुरू ठेवण्यात आली आहे, पण ती ही धिम्या गतीनं सुरू आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close