चंद्रपूरमध्ये पट्टेदार वाघाचा विहिरीत पडून मृत्यू

December 16, 2014 2:26 PM0 commentsViews:

chandrapur

16 डिसेंबर :  चंद्रपूर जिल्ह्यात विहिरीत पडून एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी परिसरात काही नागरिकांनी विहिरीत मृतावस्थेत पडलेला वाघ पाहिला आणि वनविभागाचा त्याची माहिती दिली.

हा वाघ बफर झोनमध्ये फिरत असताना ही घटना घडली. या भागातील शेतात फिरत असतानाच एका विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला. कठडे नसलेने हा वाघ विहिरीत पडला. विहिरीला पाणी असल्यानं आणि वाघाला वरती येण्यासाठी कोणती मार्ग न मिळाल्याने, तो पाण्यात बुडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

ताडोबा परिसरात असलेल्या विहिरींवर कठडे लावण्यात यावेत, अशी मागणी अनेक दिवसांपासून होते आहे. पण अजून त्याकडे कुणीच लक्षं दिलेलं नाही. वाघांची संख्या झपाट्यानं घटत असल्यानं एका-एका वाघांचं संरक्षण करणं गरजेचं बनलं आहे. पण, त्याच वेळी अशा दुर्देवी घटनांमध्ये नाहक वाघांचा जीव जात असल्यानं वन्यप्राणी संरक्षकांमध्ये चिंता व्यक्त होते आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close