याअगोदरही पाकमध्ये शाळांवर झाले हल्ले

December 16, 2014 5:11 PM0 commentsViews:

pak_school_attack16 डिसेंबर : पाकिस्तानची पेशावर भूमी आज दहशतवाद्यांच्या हल्ल्याने रक्तरंजित झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत 104 निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय. या अतिरेकी हल्ल्यात 84 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 2 अतिरेकी ठार झाले असून एकानं स्वत:ला स्फोटकानं उडवलंय. मात्र पाकिस्तानात शाळेवर हल्ला करण्याची दहशतवाद्यांची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी असे अनेक हल्ले झाले आहेत. एक नजर टाकूया या हल्ल्यांवर…

पाकिस्तान : शाळांवर अतिरेकी हल्ले

1) जानेवारी 2014
वायव्य सरहद्द प्रांतात एका सरकारी शाळेबाहेर आत्मघातकी हल्लेखोरानं स्फोट घडवला. यात एका मुलासह एका व्यक्तीचा मृत्यू झाला

2) जून 2013
वायव्य सरहद्द प्रांतातल्याच एका शिया शाळेत झालेल्या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले होते

3) सप्टेंबर 2013
वायव्य सरहद्द प्रांतातल्याच बानू गावात मुलींच्या शाळेबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला.

4) ऑक्टोबर 2012
स्वातमध्ये मलाला युसूफझई शाळेत जाण्यासाठी बसमध्ये बसली असताना तालिबान्यांनी तिच्यावर गोळी झाडली

5) सप्टेंबर 2011
शाळेच्या बसवर झालेल्या हल्ल्यात एक शिक्षक आणि तीन मुलांचा मृत्यू झाला

6) ऑगस्ट 2002
पाकिस्तानातल्या मिशनरी शाळेवर अतिरेकी हल्ला करण्यात आला. यात सहा जणांचा मृत्यू झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close