पहिली अणुपाणबुडी INS-अरिहंत भारतीय नौदलात सामील

July 26, 2009 7:51 AM0 commentsViews: 65

26 जुलै,पूर्ण क्षमता असलेली भारताची पहिली आण्विक पाणबुडी I N S अरिहंत आज नौदलात सामील झाली. कारगिल विजय दिवसानिमीत्त पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते या पाणबुडीचं लॉँचिंग झालं. 104 मीटर लांब आणि 10 मीटर रुंदीची ही न्युक्लिअर सबमरीन असून, विशाखापटणमं इथल्या नौदलाच्या गोदीमध्ये तिचं अवतरण करण्यात आलं.. 700किलोमीटरचा पल्ला असणारी 12 K-5 अण्वस्त्र डागण्याची तिची क्षमता असून, 22 नॉट वेगानं मिसाईल फायर करणारा 80 M V चा न्युक्लिअर रिऍक्टरही या पाणबुडीत आहे. 6000 टनांच्या या पाणबुडीचं निर्माण म्हणजे भारताच्या आण्विक कार्यक्रमासाठी महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा मानला जातोय.

close