जळगावमध्ये आज 3 शेतकर्‍यांनी संपवलं आयुष्य

December 16, 2014 5:50 PM0 commentsViews:

farmer suicide16 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांत 8 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजच्या दिवसात तीन शेतकर्‍यांनी आपलं आयुष्य संपवलंय. अमळनेर तालुक्यात 2, जामनेरमध्ये दोन, चाळीसगाव मध्ये दोन, पारोळयात एक तर मुक्ताईनगरमध्ये एका शेतकर्‍याने आत्महत्या केलीये.

अस्मानी संकटाने बळीराजा पुरता हैरणा झालाय. एकीकडे राज्य सरकारने सात हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. मात्र, दुसरीकडे शेतकर्‍यांचं आत्महत्या सत्र सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 12 शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपवलीये. चाळीसगांवच्या भामरे बु येथील शेषराव पाटील ,अमळनेर मधील सवखेडाचे बळीराम महाले यांनी विष पिऊन तर मुक्ताई नगरमध्ये पारबीचे संतोष गव्हळ यांनी झाड़ाला गळ फास घेऊन आत्महत्या केली. पारोळा तालुक्यातील शिरसमनीच्या देवीदास पाटील या तरुण शेतकर्‍यांनी विष पिऊन आपलं जीवन संपवलं. पाटील यांनी कापूस लावला होता. पण पाऊस उशिरा आल्याने त्यांनी दुबार पेरणी केली. या कर्जबाजारीपणातून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.त्यांच्या पश्चात 3 मुलं आहे. तर आज 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close