2003 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण : 3 जण दोषी

July 27, 2009 1:57 PM0 commentsViews: 5

27 जुलै,मुंबईत गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार इथं 25 ऑगस्ट 2003 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात तीन जणांना दोषी ठरवण्यात आलंय. विशेष पोटा कोर्टात ही सुनावणी सुरु आहे. मोहम्मद हनीफ सय्यद, त्याची बायको फहीदा सय्यद आणि अशरत शफिक अन्सारी अशी दोषी ठरवलेल्यांची नावं आहेत. या तिघांना निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असणं, दहशत पसरवणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान या आरोपांखाली पोटाच्या कायद्याच्या 3 (5) या सेक्शननुसार दोषी ठरवण्यात आलंय. या स्फोटांमागे लष्कर- ए- तोयबा ही अतिरेकी संघटनाच असल्याचं यामुळे स्पष्ट झालंय. येत्या चार ऑगस्टला या दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.2003 मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात 53जण मृत्युमुखी पडले होते. हल्ल्याचा कट या दोषींनी काही पाकिस्तानी नागरिकांसोबत दुबई येथे आखला, असं साक्षीमध्ये पुढे आल्याचं सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितलं. 'या दोषींनी त्याआधी त्यांनी 2 डिसेंबर, 2002 ला बेस्ट बस मध्ये बॉम्ब ठेवला, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर पुन्हा जुलै 2003 मध्ये बेस्ट बसमध्ये केलेल्या बॉम्बस्फोटात दोनजण ठार झाले होते. पण त्याहून मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे आदेश लश्करच्या कमांडरने दिले. त्याच्या सांगण्यावरुनच गेट वेऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. कटात एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांची मुलगी असल्याची हि पहिलीच घटना असल्याचंही निकम यांनी बोलताना सांगितलं.

close