जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी सदस्यांचा गोंधळ

July 27, 2009 2:26 PM0 commentsViews: 13

27 जुलैजम्मू-काश्मीर विधानसभा सभागृहात आज मोठा गोंधळ झाला. शोपियान बलात्कार आणि दुहेरी खून प्रकरणावरून पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्तींनी सभापतींचा माईक खेचला आणि फेकून दिला. त्यानंतर पीडीपीच्या सदस्यांनी चागंलाच गोंधळ घातला. शेवटी मार्शल्सनी त्यांना उचलून बाहेर नेलं. शोपियान प्रकरणी त्यांना बोलू दिलं नसल्यामुळं मेहबुबासह पीडीपीचे सदस्य संतापले होते. त्यामुळं त्यांनी सभागृहातच हंगामा केला. मार्शल्सनी बाहेर काढल्यांनंतर त्यांनी सभागृहाबाहेर धरणंही धरलं.

close