रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्याचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न

December 16, 2014 8:19 PM0 commentsViews:

ragging343416 डिसेंबर : रॅगिंग ही विकृती आहे, या रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचा नाहक बळी जातोय. काहीजण रॅगिंगमुळे आत्महत्याही करतात.पुण्यातील एमआयटी पॉलिमर इंजिनियर कॉलेजमध्ये असाच प्रकार घडलाय. वर्गातल्या मुलांनी केलेल्या रॅगिंगमुळे वरुण कांबळे या मुलाला मानसोपचार तज्ञाकडे उपचार घ्यावा लागत आहेत. या मुलाने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केलाय.

अभ्यासात सिंन्सिअर असलेला वरुणचा स्वभाव सहज इतरांमध्ये मिसळणारा नाहीऐ. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत यश नाईक,तेजस मिरजकर आणि निखिल श्रीमाण या आरोपी मुलांनी अश्लील शिवागीळ, शेरेबाजी करणं, थुंकी चाटायला लावणं तसंच लैंगिक अत्याचारांसारखे गंभीर प्रकार केले. यात वरुणला मानसिक धक्का बसलाय. त्याला 19 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी यश नाईक,तेजस मिरजकर आणि निखिल श्रीमाण यांना अटकही करण्यात आली आणि जामिनावर सुटकाही झाली. तर कॉलेजचे प्राचार्य मात्र रॅगिंगचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याच सांगत हात झटकले आहे. या घटनेमुळे धास्तवालेला वरुण कॉलेजला जायला सुद्धा घाबरतोय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close