मोनिकाची रेल्वे सल्लागार समितीवर नेमणूक

December 16, 2014 10:47 PM0 commentsViews:

16 डिसेंबर : लोकलच्या अपघातात दोन्ही हात गमावलेली मोनिका मोरेची आता सेंट्रल रेल्वेच्या सल्लागार समितीवर नेमणूक झाली आहे. तिला सेंट्रल रेल्वेच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून घेण्यात यावं अशी शिफारस माजी क्रिकेटर आणि राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकरनं केली होती. तो प्रस्ताव सेंट्रल रेल्वेनं लगेचच अंमलात आणलाय. सेंट्रल रेल्वेच्या समितीवर आल्यानंतर मोनिका रेल्वेत अपंगांसाठी विशेष सुविधा करण्यात याव्यात अशी शिफारस करणार आहे. अपंगांना रेल्वेच्या डब्ब्यापर्यंत व्हिलचेअर तसंच वृद्धांना लिफ्टची सुविधा देण्याचंही ती सुचवणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close