सचिनचं आत्मचरित्र लवकरच मराठीत

December 16, 2014 10:37 PM0 commentsViews:

sachin_book16 डिसेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर…सचिनचं आत्मचरित्र प्लेईंग इट माय वे आता मराठीत येणार आहे.

‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने मराठीतल्या आत्मचरित्राचे हक्क घेतले आहेत. मराठीत आत्मचरित्रामुळे सचिनच्या मराठी फॅन्ससाठी तर आनंदाची पर्वणीच आहे. 15 ते 20 मार्चच्या दरम्यान, हे आत्मचरित्र प्रकाशित होण्याची शक्यता आहे.

इंग्रजी प्रमाणीचे रूप, पेपरबॅक, पृष्ठसंख्या तीच आणि फोटोहे तेवढेच असणार आहे. सचिनचं इंग्रजी आत्मचरित्र हे देशातील सर्वाधिक खपाचं हार्डबुक ठरलंय. मराठीमध्येही सचिनचं आत्मचरित्र खपाचे नवीन विक्रम नोंदवेल अशी आशा अनिल मेहता यांनी व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close