‘पीके’च्या स्क्रिनिंगला राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकरची हजेरी

December 17, 2014 9:54 AM0 commentsViews:

PK special Screenin

17 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित ‘पीके’ हा चित्रपट रिलीज होण्याआधीच अनेक कारणांनी गाजत आहे. यामध्ये आता आणखी एका कारणाची भर पडली आहे. कारण, या चित्रपटाच्या मुंबईत पार पडलेल्या स्पेशल स्क्रिनिंग सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी सहकुटुंब हजेरी लावली होती.

राजकारण आणि क्रिकेटमधील या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे ‘पीके’च्या स्क्रिनिंग सोहळ्याला विशेष रंगत आली होती. यावेळी राज ठाकरे आणि आमिर खान यांनी चित्रपटाचे आणि आमिर खानचे तोंडभरून कौतूक केले. चित्रपटागणिक बदलणारा आमिरचा लूक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. त्यात हटके कथानक हे आमिरच्या आजवरच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य राहिल्यामुळे तमाम आमिरप्रेमींना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.

आमिर खान आणि राजू हिरानी यांनी आजवर नेहमीच वेगळे आणि नावीन्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा, असे राज यांनी सांगितले. तर, सचिन तेंडुलकरने आमिरच्या कारकिर्दितील हा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणून ‘पीके’चे कौतूक केले आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close