देशभरातील शाळांमध्ये मुलांनी वाहिली श्रद्धांजली

December 17, 2014 11:11 AM2 commentsViews:

stussdent

17 डिसेंबर : भारतातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी आज दोन मिनिटे मौन पाळून, पेशावरमधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्ध्यांना आदरांजली वहावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

मंगळवारी झालेल्या या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फोन करून पेशावर येथील हल्ल्यात बळी गेलेल्यांप्रती शोक व्यक्त केला होता. दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारत पाकिस्तानसोबत ठामपणे उभा आहे, असं आश्वासन मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना दिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे देशभरातल्या शाळांमध्ये आज स्तब्धता पाळली जात आहे. पेशावरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या रक्तपाताला भारत आपल्या मौनातून आज उत्तर देत आहे. मौन हा त्या बंदुकीतून निघाणार्‍या गोळ्यांच्या आवाजांपेक्षाही भयाण आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेतली मुलं आज पेशावरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्याच मित्रांना आदरांजली वाहत आहेत.

भारताची राजधानी नवी दिल्लीपासून 800 किलोमीटर दूर असलेल्या पाकिस्तानच्या पेशावर शहरात दहशतवादी हल्ला झाला. पेशावरमधील आर्मी स्कूलला काल (मंगळवारी) दहशतवाद्यांनी टार्गेट केलं होतं. यामध्ये 132 विद्यार्थ्यांसह 141 जणांचा मृत्यू झाला. तर 122 जण जखमी आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबाननं घेतली असून हल्ल्यात शाळेत घुसलेल्या सर्व 9 अतिरेक्यांना ठार करण्यात लष्कराला यश आलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aakashhiwale

    तीस करोड़ मुस्लिमों का यह देश भारत क्या ईरान, इराक, पाकिस्तान, सीरिया, अफगानिस्तान और अन्य पश्चिम एशियाई देशों के लिए शांति तथा भाईचारे की मिसाल नहीं है? क्या आपको नहीं लगता कि इन देशों को भारत से सीखा लेना चाहिए? क्या दुनिया को एक बार फिर विश्व शांति का सबक भारत से लेना चाहिए? आन देश की शान देश की, देश की हम संतान हैं;
    तीन रंगों से रंगा तिरंगा, अपनी ये पहचान है! Jai Hind Jai Bharat

close