आणखी 7 जणांना H1N1 ची लागण

July 28, 2009 1:43 PM0 commentsViews: 2

28 जुलैपुण्यात आणखी सहा जणांना आणि मुंबईत एका तरुणीला H1N1 ची लागण झाल्याच स्पष्ट झालंय. त्यामुळे या रुग्णांचा आकडा आता 101 वर गेलाय. परदेशी विद्यार्थी आणि परदेशातून पुण्यात परत आलेले विद्यार्थी यांच्यामुळे पुण्यात H1N1 ची लागण झाल्याचं आरोग्यमंत्री डॉ.राजंेद्र शिंगणे यांनी मान्य केलंय.पुण्यात आज डॉ.शिंगणे यांनी पत्रकार परिषद घेतली. पुण्यात परदेशातून येण्या-या विद्यार्थ्यांची विमानतळावर तपासणी करण्यात येईल. H1N1 ची लागण झालेल्या रुग्णावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याचे आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिलेत. आतापर्यंत 32 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलंय. पुण्यात H1N1 वर उपचार करणा-या केंद्रांची क्षमता वाढवण्यात आलीय.

close