केंद्रीय पथकाचे ‘पाढे पंचावन’, पुन्हा अंधारात लावले ‘दिवे’ !

December 17, 2014 5:00 PM0 commentsViews:

yavatmal34317 डिसेंबर : अकोला आणि उस्मानाबादमध्ये केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकानं रात्री उशीरा ट्रॅक्टरच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी केली होती. या प्रकारावर चहुबाजूंनी प्रचंड टीका होऊनही केंद्रीय पथकाने पुन्हा पाढे पंचावन केले आहे. यवतमाळमध्ये केंद्रीय पथकाने मध्यरात्री गाड्याच्या प्रकाशातच पाहणी केली.

यवतमाळ जिल्ह्यातील नागेशवाडी इथं साडेचार वाजता पाहणीसाठी केंद्रीय पथकाचं आगमन होणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात रात्री साडेसातच्या सुमारास पथक पोहोचलं. शिवाय पूर्वनियोजनानुसार पथक नागेशवाडीची पाहणी करणार होतं. मात्र तिथं न थांंबता पथक मुडना या गावी पाहणीसाठी गेलं. त्यामुळे नागेशवाडीचे शेतकरी चांगलेच संतापले आणि त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत नागपूर-तुळजापूर राज्यमहामार्ग अडवून धरला. संतापलेल्या शेतकर्‍यांनी पथकावर प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा नमतं घेत पथकाला नागेशवाडीला यावं लागलं. दरम्यान, उशीर झाल्याने नागेशवाडी आणि मुडनाच्या शेतांची पाहणीही वाहनांच्या प्रकाशातच करावी लागली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close