अखेर बेस्टचा प्रवास महागला, एक फेब्रुवारीपासून 1 रुपयाने दरवाढ

December 17, 2014 7:32 PM0 commentsViews:

best_bus3417 डिसेंबर : अखेर बेस्टचा प्रवास महागणार यावर शिक्कामोर्तब झालंय. एक फेब्रुवारीपासून बेस्टच्या प्रवासात 1 रुपयांची वाढ होणार आहे. आज झालेल्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिश्यावर आता आणखी भार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेनं बेस्ट प्रशासनाला दीडशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र अजूनही हे पैसे बेस्टला मिळू शकले नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने पर्यायाने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. बेस्टने एप्रिल महिन्यापासून 2 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून 1 रुपयाने दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. बेस्ट प्रशासनाने मागिल महिन्यातच याला मंजुरी दिली. आज स्थायी समितीच्या बैठकीतही या दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. तर एप्रिल महिन्यात आणखी 1 एक रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे. आता या दरवाढीमुळे शालेय विद्यार्थांना मोठा फटका बसणार आहे. विद्यार्थ्यांचा मासिक पास आता चांगलाच कडाडणार आहे. 125 रुपयांच्या पाससाठी 300 रुपये मोजावे लागणार आहे.

बेस्टची नवी भाडेवाढ

पूर्वीचे दर       नवीन दर

6 रुपये          7 रुपये
10 रुपये       13 रुपये
12 रुपये        16 रुपये
15 रुपये        20 रुपये
18 रुपये        25 रुपये
20 रुपये       30 रुपये
मासिक पासच्या दरांतली वाढ
पूर्वीचे दर                    नवीन दर

विद्यार्थी पास                                125 रुपये               300 रुपये
मॅजिक बिगर एसी पास         1000 रुपये             1200 रुपये
मॅजिक एसी पास                   3000 रुपये            3500 रुपये
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close