‘बापूजी हम शरमिंदा हैं,दहशतवाद अभी जिंदा हैं’

December 17, 2014 8:07 PM0 commentsViews:

17 डिसेंबर : अहमदनगरमध्ये आज पेशावरच्या सैनिक शाळेतल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. नगरमधील वाडिया पार्कजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर निषेध सभा पार पडली. यावेळी अनेक सेवाभावी संस्था आणि विद्यार्थ्यानी मृतांना श्रद्धांजली वाहिली. ‘बापुजी हम शरमिंदा हैं, दहशतवाद अभी जिंदा हैं’ , अशा घोषणा देत या स्वयंसेवी संस्थांनी या घटनेचा निषेध केला. दहशतवाद संपवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close