कोंडाणे लघुप्रकल्प घोटाळ्याप्रकरणी 7 जण निलंबित

December 17, 2014 10:58 PM0 commentsViews:

kondane_karjat17 डिसेंबर : कर्जतमधील कोंडाणे लघुप्रकल्पातल्या अनियमिततेप्रकरणी सात जणांवर कारवाई करण्यात आलीय. या सातही जणांचं निलंबन करण्यात आलंय. प्राथमिक तपासात अनियमितता उघड झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली.

भाजप आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर भाजपने आता आक्रमक भूमिका घेत कामाचा धडाका लावलाय. कर्जतमधील कोंडाणे लघुप्रकल्प घोटाळ्या प्रकरणी सात जणांना निलंबित करण्या आलंय. सध्या कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता राजेश रिठे, उपविभागीय अभियंता गिरीराज जोशी, विजय कसाट यांना निलंबित करण्यात आलंय. यात तीन निवृत्त अधिकार्‍यांचाही समावेश आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत ही माहिती दिलीय. सुरुवातीला 80 कोटीचं बजेट असलेल्या या प्रकल्पाची किंमत 327 कोटी करण्यात आली. हे करताना कुठलेही सरकारी नियम पाळण्यात आले नाही. प्राथमिक तपासात ही अनियमितता उघड झाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलीय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जलसंपदा मंत्री असताना हा घोटाळा झाला होता.

काय आहे कोंडाणे लघु पाटबंधारे योजना घोटाळा ?

- 2011 चा हा प्रकल्प आहे.
– 80.35 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता या प्रकल्पाला देण्यात आली होती
– हा प्रकल्प पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर याची मान्यता गृहित धरण्यात येणार होती
– तसं न करता प्रकल्प सुरु करण्यात आला
– मात्र तीनच महिन्यात एका बैठकीत प्रकल्पाची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला
– 33 मीटर उंची वाढवण्यात आली आणि प्रकल्पाची किंमत 328.62 कोटी रुपये झाली
– यात शासनाची परवानगी न घेता राज्यपालांच्या सुचनांचं उलंघन झालंय
– वन विभागाचीही परवानगी नाही
– पर्यावरणविषयक कुठलीच परवानगी नाही
– आणि तरीही या प्रकल्पाच काम सुरू झालं
– या प्रकल्पात बुडीत क्षेत्र,भुसंपादन,पुर्नवसन आदींची मंजुरी घ्यायला हवी होती ती देखील घेण्यात आली नाही
– या सर्व प्रकल्पात माती धरण,सांडवा, मध्यवर्ती संकल्पचित्र यांचीही परवानगी घेतली नाही
– यामध्ये कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक डी.पी. शिर्के निलंबित
– शिर्केंसह 7 अधिकार्‍यांची विभागीय चौकशी करण्यात आलीय

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close