भारत-पाक संयुक्त निवेदनावर सोनियांचा पंतप्रधानांना पाठींबा

July 30, 2009 7:01 AM0 commentsViews: 2

30 जुलैभारत पाक संयुक्त निवेदनावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधानांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत. या निवेदनाचं त्यांनी ठामपणे समर्थन केलं आहे. काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधींनी पक्षाच्या खासदारांना सांगितलं, की भारतानं दहशतवादाबद्दलची भूमिका मवाळ केलेली नाही. आणि जोवर पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करत नाही तोवर द्विपक्षीय चर्चा सुरू होणार नाही. भारत पाक संयुक्त निवेदनावरुन सरकार आणि सत्तधारी पक्षात दुमत असल्याचं बोललं जात होतं. मात्र सोनिया गांधींच्या वक्तव्यामुळे सरकार आणि काँग्रेस पक्ष यांच्यात एकवाक्यता आहे हे सिद्ध होतंय असं पक्षाचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी सांगितलंय.

close