मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रकने घेतला पेट!

December 18, 2014 8:43 AM0 commentsViews:

MUMbai pune Express way

18  डिसेंबर :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर आज (गुरूवारी) सकाळी एका ट्रकने अचानक पेट घेतल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे एक्स्प्रेस मार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. खंडाळ्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

सुताची वाहतूक करणार्‍या या ट्रकने खंडाळ्याजवळ अचानकपणे पेट घेतल्याचे असं सांगण्यात येत आहे.  ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत असून, साडेनऊ टन सुताचा साठा असल्याने आग वेगाने पसरली आणि ट्रक जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली असून, वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी किती वेळ लागेल याची, कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close