विनोदची नवी इनिंग : विधानसभेसाठी उभा राहणार

July 30, 2009 11:36 AM0 commentsViews: 1

30 जुलैविनोद कांबळीनं आपल्या नव्या इनिंगची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विनोद तिस-या आघाडीसाठी बॅटींग करणार आहे. आणि हो विधानसभेची निवडणूकही लढवणार आहे. विनोद कांबळी कपिल पाटील यांच्या लोक भारती या पक्षात सामील झाला आहे. कपिल भारती यांचं काम आवडल्याने आपण या पक्षात सामील झाल्याचं विनोदने सांगितलं. या पार्टीत राहून त्याला लोकांसाठी काम करायचं आहे. त्याला लोकांच्या प्रेमाची परतफेड करायची आहे. यासाठी त्याने पार्टी तर्फे 'स्पोर्ट्स भारती' ही संस्था सुरु केली आहे. या संस्थेद्वारे गरीब मुलांची मदत केली जाणार आहे. ही संस्था त्यांना शिक्षण आणि खेळांमध्ये प्रोत्साहन देणार आहे. लोकांना आणि आपल्या चाहत्यांना पटलं तर आपण नक्कीच विधानसभा निवडणूक लढवणार असं विनोद कांबळी याने सांगितलं.

close