धक्कादायक, ‘त्या’ बालगृहात आणखी 7 अनाथ मुलींचं लैंगिक शोषण

December 18, 2014 7:14 PM0 commentsViews:

tapwoan318 डिसेंबर : अमरावतीमधील तपोवन इथं एका 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार प्रकरणाच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. इथं राहणार्‍या आणखी सात मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, असं राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी IBN लोकमतला सांगितलं. या मुलींंचे जबाब नोंदवण्याचं काम सुरु असल्याचं मिरगे यांनी स्पष्ट केलं.

समाजसेवक पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यासांठी, अनाथासाठी तपोवन येथे राहण्याची सोय केली, याच तपोवनातील बालगृहात एका 14 वर्षाच्या अनाथ मुलीवर 26 नोव्हेंबर रोजी संस्थेतील नारायण कोठेवार या कर्मचार्‍याने अत्याचार केल्याची घटना पाच दिवसांपूर्वी उघड झाली. पोलिसांनी नारायण कोठेवार याला अटक केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी इतर मुलींकडे ही चौकशी सुरू केली असता आणखी काही मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं उघडकीस आलंय. त्या सात मुलींचा पोलिसांनी आज जबाब नोंदविली आहे.

इथल्या अनाथ मुलींना संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या घरची काम करावी लागत होती. एका कर्मचार्‍याच्या मुलांच्या गाडीवर इथल्या काही मुली बाहेर पडत असल्याचंही समोर आलंय. त्याबाबत मुलींनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर अधिकार्‍यांनी कोणतीही कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

यापूर्वी अनेक मुलींनी वसतीगृहातील कर्मचार्‍यांनी लैगिंक शोषणाबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्या तक्रारींची तपोवन येथील सचिव गोसावी, अधिक्षक सुटे यांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे आता योग्य तपास झाल्यास संस्थेतील अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close