शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर बलात्काराचा गुन्हा दाखल

December 18, 2014 7:31 PM0 commentsViews:

vjay_452318 डिसेंबर : नवी मुंबईतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका 26 वर्षीय पीडित तरुणीनं त्यांच्याविरोधात तक्रार दिलीये. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत असून त्यानंतरच चौगुलेंच्या अटकेचा निर्णय होईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

2008 ते 2014 अशी 6 वर्षं धमकावून लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिनं विजय चौगुले यांच्यावर केलाय. या पीडितेच्या तक्रारीवरून सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

दरम्यान, विजय चौगुले यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा करत बलात्काराचा आरोप फेटाळला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा चौगुले यांनी केलाय. पीडित तरुणीच्या आरोपांची पूर्ण शहानिशा करुन मग चौगुलेंना अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close