लग्न नको, मला शिकायचंय; मंडपात नवरी प्यायली फिनाईल !

December 18, 2014 8:34 PM0 commentsViews:

ullhasnagar18 डिसेंबर : लग्न लागण्यास अवघे काही मिनिटे असताना नवरी मुलीने लग्नाच्या मंडपातून बाथरूममध्ये जाऊन फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उल्हासनगर येथील हिरा मेरेज हॉलमध्ये घडली. मुलीने आपणास शिकायचे असताना आपल्या वडिलांनी जबरदस्तीने लग्न लाऊन देण्याचा प्रयत्न केल्याने आपण हे पाऊल उचल्याचे पोलिसांना सांगितलं.

घडलेली हकिकत अशी की, घाटकोपर येथील दोन सख्या बहिणींची लग्ने उल्हासनगर येथील दोन मुलांशी ठरले होते. त्यानुसार आज दुपारी लग्नाचा सोहळा पार पडणार होता त्यामुळे दोन नवरी, दोन नवरे आणि वर्‍हाडी अशी गर्दी येथील हिरा मेरेज हॉलमध्ये जमली होती. मोठ्या बहिणीचे लग्न सोहळा सुरू होता त्यावेळी लहान बहीण समोर बसली होती, मोठ्या बहिणेचे लग्न पार पडले आणि आता लहान बहिणीचा लग्न सोहळा सुरू होणार तसे, नवरी मुलीने आपणास बाथरूममध्ये जायचे आहे असं सांगितलं आणि बाथरूममध्ये गेली आणि तिने फ़िनाईल पिऊन घेतले आणि बाथरूम मधून बाहेर येताच ती कोसळली. तिला तातडीने येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर शुद्धीवर आली असता आपण 10 वीत शिकत असून आपल्याला पुढे शिकायचं आहे असं असताना आपले वडील माझं जबरदस्तीने लग्न लाऊन देत होते म्हणून आपण फिनाईल पिल्याचे पोलिसांना सांगितलंय.

मात्र, मुलींच्या वडिलांचे म्हणणे आहे की, मी अतिशय गरीब असून काचपात्र वेचून मी माझे कुटुंब चालवतो, माझी बायको मला पाच वर्षापूर्वी सोडून गेली, त्यामुळे तरुण मुली ह्या एकट्या घरी राहत, त्यांना मागणे आले त्यावेळी त्यांना मी विचारले, मात्र आज माझ्या लहान मुलीने असा प्रकार केला. तिच्या याप्रकारामुळे तिच्या मोठ्या बहिणीला सुद्धा आता तिच्या माहेरचे लोक नेण्यास नकार देत आहे.

याप्रकाराने लग्न सोहळ्यात एकच गोंधळ उडाला, पोलिसांनी मात्र याप्रकरणी मुलगी आपण अल्पवयीन असल्याचे सांगत आहे, त्याबाबतची खात्री करून याबाबत कारवाई करणार आहेत असं पोलिसांनी सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close