पुणेकरांचा प्रवास महागला, पीएमपीचे भाडे महागले

December 18, 2014 11:09 PM0 commentsViews:

Image img_225462_pmp346_240x180.jpg18 डिसेंबर : पुणेकरांचा बस प्रवास आता महागणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीची प्रवासी भाडेवाढ करण्यात आली आहे. सहा किलो मिटर नंतरच्या प्रत्येक टप्प्यात 5 रूपयाने ही भाडेवाढ करण्यात आली आहे. उद्यापासून ही भाडे वाढ लागू होणार आहे.

पण मासिक आणि दैनिक पासेसधारकांना दिलासा मिळाला आहे. पासेसच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. मात्र सर्वसामान्य प्रवासाच्या भाड्यात 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. पीएमपीकडून आलेल्या प्रस्तावानंतर या भाडेवाढीला रस्ते वाहतूक प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. पीएमपीची वित्तीय तूट, डिझेल आणि सिएनजी गॅसचे वाढलेले दर यामूळे ही भाडेवाढ केल्याचं आरटीएच्या वतीने सांगण्यात आलं. या भाडेवाढी मुळे पीएमपीला वार्षिक 108 कोटी रूपयाचा फायदा होणार आहे. मात्र सर्वसामान्य पुणेकारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पीएमपी बस तिकीट दरात वाढ
– 20 टक्के दरवाढीला मान्यता
– उद्यापासून लागू होणार दरवाढ
– पहिल्या टप्प्यात 6 किमीसाठी वाढ नाही
– जिल्हाधिकार्‍यांनी दिली मान्यता
– वार्षिक 109 कोटींचं मिळणार उत्पन्न

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close